S M L

डिझेल टँकर उलटला, गावकर्‍यांनी रिकामाच केला !

Sachin Salve | Updated On: Oct 10, 2015 05:51 PM IST

डिझेल टँकर उलटला, गावकर्‍यांनी रिकामाच केला !

10 ऑक्टोबर : अहमदनगर - पाथर्डी मार्गावर करंजी घाटात काल शुक्रवारी सायंकाळी 12 हजार लिटर क्षमतेचा डिझेलचा टँकर पलटी झाला. मात्र नागरिकांसाठी ही पर्वणीच ठरली. स्थानिक गावकर्‍यांनी सांडलेल्या डिझेलवर डल्ला मारला. लाखो रुपयांचं डिझेल नागरिकांनी हातोहात लुटलं.

या अपघाताचा स्थानिक नागरिकांनी चांगलाच फायदा घेतला. टँकर पलटी झाल्याची खबर लोकांपर्यंत पसरताच सांडलेलं डिझेल गोळा करण्यासाठी लोकांची चांगलीच झुंबड उडाली. प्लास्टिक बॉटल्स, ड्रम,बादली जे घरात किंवा रस्त्यावर हातात मिळेल ते घेऊन नागरिक डिझेल गोळा करण्यासाठी धाव घेऊ लागले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बघता बघता लोकांनी पाच हजार लिटर डिझेल फस्त केलंय.

यामुळे काहीकाळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. वळण मार्गावर डिझेलच्या टॅकरला हिसका बसल्यानं टँकर पलटी झाल्याचं समजतंय. पेट्रोल पंपावर डिझेल वितरणासाठी टँकर जाताना ही दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत चालक जखमी झाला असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

तसं बघायला गेलं तर आज बाजारभावाप्रमाणे पाच हजार लिटरची किंमत ही लाखो रूपयांत मोजली जाईल. पण, अपघात राहिला बाजूला नागरिकांनी डिझेल लुटण्याचा पराक्रम पहिला गाजवला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाथर्डी जवळ 13 हजार लिटर खाद्यतेलाचा टँकर पलटी झाला होता. त्यावेळीही तेल गोळा करण्यासाठी नागरिकांची अशीच झुंबड उडाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 10, 2015 05:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close