S M L

सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्यांवर गुन्हे नोंदवा - मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Oct 11, 2015 05:37 PM IST

iasd;shduhasuihy

11 ऑक्टोबर : ठाण्यातील कॉसमॉस ग्रुपचे मालक बिल्डर सुरज परमार यांच्या प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. सुरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परमारांनी लिहलेल्या सुसाईड नोटची गंभीर दखल घेतली आहे. परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार मंगलप्रभात लोढ़ा, आणि बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी काल (शनिवारी) मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. परमार यांनी लिहिलेली सुसाईट नोट मुख्यमंत्र्यांनी वाचल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.

परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही लोकप्रतिनिधी, ठाणे महापालिका अधिकारी आणि एका पत्रकाराचे नाव आढळून आले असून, त्या सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

एमसीएचआयचे (महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्रीज) विद्यमान अध्यक्ष असलेल्या 49 वर्षीय सूरज परमार यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने बुधवारी खळबळ उडाली होती. घोडबंदर रोडवरील कॉसमॉस हेवन व्हिलेज या त्यांच्या बांधकाम साईटवरच्या सँपल फ्लॅटमध्ये दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी मानेत एक राऊंड फायर केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2015 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close