S M L

मोदींच्या हस्ते इंदू मिलमधल्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं भूमीपूजन

Samruddha Bhambure | Updated On: Oct 11, 2015 05:44 PM IST

मोदींच्या हस्ते इंदू मिलमधल्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं भूमीपूजन

11 ऑक्टोबर : इंदू मिलमधील बहुप्रतिक्षित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या मुंबई दौर्‍यातील सर्व कार्यक्रमांवर शिवसेनेने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या अन्य नेते आमंत्रण वेळेवर न मिळाल्याने या सोहळ्याला गैरहजर होते. तर दुसरीकडे राज्यातील सर्व दिग्गज रिपब्लिकन नेत्यांना या कार्यक्रमासाठी आवर्जून बोलावण्यात आलं होतं. या नेत्यांमध्ये प्रकाश आंबेडकर, राजेंद्र गवई, रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे यांचा समावेश होता. महत्वाचं म्हणजे या सर्व नेत्यांच्या हातून भूमीपूजनही करण्यात आलं. त्यामुळे भाजपा - शिवसेनेतील धूसफुस पुन्हा एकादा चव्हाट्यावर आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2015 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close