S M L

केडीएमसीत सेना-भाजप युती तुटण्याच्या उंबरठ्यावर ?

Sachin Salve | Updated On: Oct 12, 2015 07:25 PM IST

केडीएमसीत सेना-भाजप युती तुटण्याच्या उंबरठ्यावर ?

12 ऑक्टोबर : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत युती जवळ जवळ तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीये. भाजपने रिपाइंसोबत निवडणूक लढवण्याचं जवळपास निश्चित केलं आहे. रिपाइंला 10 जागा सोडणार आहे. उरलेल्या सर्व जागांवर उमेदवारांची नावं निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे शिवसेनेनंही भाजपचा सर्व दबाव झुगारता स्वबळावर निवडणूक लढवण्याचं पक्क केलंय. शिवसेनेनं आपली उमेदवारांची यादी उद्या 'सामना'मधून जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना सोबत नसतांना भाजपला विधानसभेत भरघोस यश मिळालं तर नंतर नवी मुंबईत दोघांना एकत्र लढवून भाजपला फारसं यश मिळालं नाही पण त्याउलट औरंगाबादमध्ये स्वतंत्रपणे लढून चांगलं यश मिळालं.त्यामुळेच कल्याण डोंबिवलीमध्ये स्वंतत्र निवडणूक लढावी हाच विचार भाजपच्या नेत्यांपुढे होता. आणि त्यात भरीस भर कालच्या पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकल्याने भाजप चांगलीच नाराज झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2015 07:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close