S M L

सुधींद्र कुलकर्णी भारतातले कसाब -शिवसेना

Sachin Salve | Updated On: Oct 13, 2015 05:18 PM IST

सुधींद्र कुलकर्णी भारतातले कसाब -शिवसेना

13 ऑक्टोबर : सुधींद्र कुलकणीर्ंवर पेंट हल्ल्यानंतर आज अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेतलंय. पाकड्यांसाठी राष्ट्रभक्तांच्या भावना मारणार काय? या शीर्षकाखाली 'सामना'मध्ये अग्रलेख लिहिण्यात आला आहे. कुलकर्णी पाकिस्तानचे एजंट असं सांगत त्यांची तुलना 'कसाब'शी करण्यात आलीये. तसंच यापुढेही त्यांना आणि त्यांच्यासारखी भूमिका ठेवणार्‍यांना लक्ष्य करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय.

काय लिहिलंय 'सामना'मध्ये

सुधींद्र कुलकर्णी ज्याप्रकारे त्यांचे काळे थोबाड घेऊन अत्यानंदाने आणि अभिमानाने फिरत आहेत हा निर्लज्जपणाचा कळस आहे. पाकिस्तानची चमचेगिरी करणार्‍यांचे तोंड राष्ट्रभक्त जनतेने काळे केले आणि त्याबद्दल जनता आनंदाने टाळ्या वाजवीत आहे. पाकी एजंटांच्या तोंडास काळी शाई फासली की डांबर फासले हे ठरायचे आहे, पण पाकड्यांसाठी देश गहाण ठेवणार्‍यांना यापुढे असे काळ्या तोंडानेच फिरावे लागेल.

देशनिष्ठा आणि देशाचे संरक्षण हा महाराष्ट्राचा धंदा असून शिवसेना तोच धंदा इमानेइतबारे करीत आहे. याच मर्दानी कामांसाठी शिवसेना प्राणपणाने लढत आहे. आपल्या देशाला खरा धोका धर्मांध अतिरेकी मुसलमानांपासून नसून सुधींद्र कुलकणीर्ंसारख्या छचोर बाटग्यांपासून आहे. असे बाटगे मूठभर असले तरी त्यांच्या प्रसिद्धीची दाढी हातभर आहे.

त्या दाढीच्या केसाने देशाचा गळा कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाकचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महंमद कसुरी हे जणू आपले व्याहीच आहेत अशा थाटात या महाशयांनी स्वागताची आखणी केली. कुलकणीर्ंसारखे लोक येथे मौजूद असल्यावर पाकिस्तानला 'कसाब' वगैरे पाठवून घातपाती कारवाया घडविण्याची गरज ती काय?

कुलकणीर्ंनी जीनांचे गोडवे गाऊन भाजपची कबर खणली. कुलकणीर्ंमुळे कॅश फॉर व्होट प्रकरणात भाजपची मान शरमेनं खाली गेली तर अडवानींवर नामुष्की ओढवली. फडणवीसांनी अशा पाकी एंजटचा बंदोबस्त करावा अशी मागणीही करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2015 01:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close