S M L

अहमदनगरमध्ये भीषण अपघातात 4 भाविक ठार

Sachin Salve | Updated On: Oct 13, 2015 02:52 PM IST

अहमदनगरमध्ये भीषण अपघातात 4 भाविक ठार

13 ऑक्टोबर : अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंद्यावरून मोहोटा देवीची ज्योत आणण्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळाले घाला घातला. श्रीगोंदा अहमदनगर रोडवर चिखली शिवारात कंटेनर आणि पिकप व्हॅनच्या अपघातात 1 जण जागीच ठार झाला तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात एकूण 21 जण जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परसराम शेलार, योगेश लगड, तुषार लगड, सोमनाथ लगड अशी मृतांची नावं आहेत. रात्रीच्या वेळी समोरून येणार्‍या कंटेनरचा अंदाज न आल्याने हा अपघात झालाय. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2015 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close