S M L

कुलकर्णींना पेंट फासणार्‍या शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंनी थोपटली पाठ !

Sachin Salve | Updated On: Oct 13, 2015 05:15 PM IST

कुलकर्णींना पेंट फासणार्‍या शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंनी थोपटली पाठ !

13 ऑक्टोबर : सुधींद्र कुलकर्णींवर ऑईल पेंट फेकणार्‍या शिवसैनिकाची आज (मंगळवारी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पाठ थोपटलीये. या शिवसैनिकांना 'मातोश्री'वर बोलावून त्यांना शाबासकी देण्यात आली. विभागप्रमुख गजानन पाटील यांच्यासह 6 शिवसैनिकांचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केलंय.

ओआरएफ संस्थेचे संस्थापक सुधींद्र कुलकर्णी यांनी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद मेहमूद कसुरी यांच्या 'नायदर अ हॉक नोर अ डोव्ह' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या वादानंतर पार पडला. शिवसेनेनं या पुरस्कार सोहळ्याला विरोध दर्शवला होता. याचा निषेध म्हणून सोमवारी सकाळी सुधींद्र कुलकर्णी यांना शिवसैनिकांनी आईल पेंट फासलं होतं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

शिवसेनेनं प्रखर भूमिका घेत आम्ही पाकिस्तान विरोधात गेल्या 25 वर्षांपासून मैदानात आहोत. कुलकर्णीना फासण्यात आलेला रंग हे जवानाचं रक्त आहे अशी जळजळीत प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.

एवढंच नाहीतर कुलकर्णी हे पाकिस्तानचे एजंट आहे अशी टीका राऊतांनी केली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रक काढून सेनेच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली अशी टीका केली होती.

आज या वादानंतर 'सामना'मधूनही भाष्य करण्यात आलं. पण, खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच या प्रकरणी शिवसैनिकांची जोरदार बाजू घेतली. कुलकर्णी यांना पेंट फासणार्‍या शिवसैनिकांचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केलंय. विभागप्रमुख गजानन पाटील यांच्यासह 6 शिवसैनिकांना थेट 'मातोश्री'वर बोलवण्यात आलं होतं. पाटील यांच्यासह सहा शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी शाबासकी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2015 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close