S M L

आमचा राष्ट्रवाद पटत नसेल तर सत्ता सोडा -राऊत

Sachin Salve | Updated On: Oct 13, 2015 10:33 PM IST

आमचा राष्ट्रवाद पटत नसेल तर सत्ता सोडा -राऊत

13 ऑक्टोबर : शिवसेनेनं महाराष्ट्राची काय बदनामी केली आहे याचा खुलासा व्हायला पाहिजे. जर आमचा राष्ट्रीय बाणा टोचत असेल तर तुम्ही सत्ता सोडा असं जाहीर आव्हानच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिलंय. प्रत्येक वेळा आमच्याच मंत्र्यांनी राजीनामा का द्यावा त्यांना पटत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, स्वाभिमान पटत नाही अशी भूमिका त्यांनी घ्यावी असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

सुधीर कुलकर्णी पेंट हल्ल्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये संबंध ताणले गेले आहे. शिवसैनिकांनी कसुरींच्या पुस्तकाला विरोध करत कुलकणीर्ंना पेंट फासल्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या पाक धार्जिण्या भुमिकेमुळेच महाराष्ट्राची बदनामी झाली असा पलटवार केला होता. आणि आज संध्याकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचं नाव न घेता टीकास्त्र सोडलं.

शिवसेनेमुळे महाराष्ट्राची बदनामी कशी झाली हे स्पष्ट व्हायला हवं. उलट शिवसेनेच्या या भूमिकेमुळे आज मराठी माणसाचं मान राखला गेलाय. कालच्या कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांनी बंदी घाल्याला हवी होती पण तसं झालं. 26/11 हल्ल्यात ज्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला. त्याच पाकच्या मंत्र्यांना काल आपले पोलीस मान खाली घालून संरक्षण देत होते. हा खरं तर शहिदांचा आणि पोलिसांचा अपमान आहे अशी घणाघाती टीका राऊत यांनी फडणवीस सरकारवर केली.

हे मंत्रिमंडळ केवळ भाजपच नाही. जर भाजपला स्वता:च सरकार बनवू शकलं असतं तर त्यांनी ते बनवायला हवं होतं. पण आमचा राष्ट्रीय बाणा कुणाला टोचत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. प्रत्येक वेळा आमच्याच मंत्र्यांनी राजीनामा का द्यावा. त्यांना पटत नसेल तर त्यांनी सेनेचा स्वाभिमान पटत नाही असं सांगत राजीनामा द्यावा. सरकार दोघांचं आहे. आमचा राष्ट्रवाद त्यांना वाईट वाटत असेल तर त्यांनी बाहेर पडावं असं आव्हानच संजय राऊत यांनी फडणवीस सरकारला दिलं. आम्ही राष्ट्रभक्त हा आमचा गुन्हा का? असा खडासवालही राऊत यांनी विचारला. दरम्यान, या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मंत्रिमंडळाच्या आणि कल्याण डोंबिवली निवडणुकीत युतीच्या मुद्यावर बोलण्याचं टाळलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2015 07:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close