S M L

कोका-कोलाला पाणी देण्यास स्वाभिमान संघटनेचा विरोध

27 जानेवारी ठाणे जिल्ह्यातल्या वाडा इथं असलेल्या कोका-कोला कंपनीच्या प्लांटमध्ये वैतरणा नदीतील पिण्याचं पाणी वापरलं जात असल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेने केला आहे. तसंच या विरोधात स्वाभिमानने कोका-कोलाविरूद्ध मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे. मुंबई शहरात पाणीटंचाई आणि पंधरा टक्के पाणीकपात सुरू असताना कोका-कोलाच्या प्लांटमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. असं या तक्रारीत स्वाभिमान संघटनेने म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेने यावर योग्य कारवाई केली नाही. तर कोका- कोला कंपनीचं कोणतंही प्रोडक्ट महाराष्ट्रात विकू देणार नाही, असा इशारा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2010 01:32 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2010 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close