S M L

लोकशाहीर अमर शेख राष्ट्रपुरुषांच्या यादीत आहे का ?, पालिकेकडून मैदानासाठी विचारणा

Sachin Salve | Updated On: Oct 14, 2015 01:59 PM IST

amar shekh14 ऑक्टोबर : लोकशाहीर अमर शेख जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमासाठी अभ्युदत नगरमधील भगतसिंग मैदान देण्याबाबत मुंबई महापालिकेकडून अजून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट अमर शेख राष्ट्रपुरुषांच्या यादीत आहे का असा अजब सवालच उपस्थित केला.

समारंभ समितीच्या पदाधिकार्‍यांनी काल मनपा आयुक्त अजय मेहता यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची भेट आयुक्तांच्या ओएसडींशी भेट झाली. त्यांनीही अमरशेखांचं नाव राष्ट्रपुरूषांच्या यादीत आहे का असा सवाल विचारून तांत्रिक बाबी सांगत कार्यक्रमासाठी मैदान देण्यास असमर्थता दाखवली.

एकीकडे शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी नसताना शिवसेना नियमात पळवाटा शोधून तिथे सभा घेण्याचा प्रयत्न करतेय तर अमरशेख यांच्या जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रमाला तांत्रिक कारण पुढे करत शिवसेनेची सत्ता असलेली मनपा परवानगी नाकारतीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2015 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close