S M L

अर्थमंत्री अरूण जेटली शरद पवारांच्या घरी मुक्कामी

Sachin Salve | Updated On: Oct 16, 2015 10:45 PM IST

अर्थमंत्री अरूण जेटली शरद पवारांच्या घरी मुक्कामी

16 ऑक्टोबर : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आज (शुक्रवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत बारामती येथील गोविंद बागेत मुक्कामी राहणार आहे. बारामतीत एका खासगी कार्यक्रमासाठी जेटली शहरात येणार आहे. यासाठी आज ते पवारांच्या घरी मुक्कामी असणार आहे.

जेटलींच्या हस्ते बारामतीत दोन कार्यक्रम होणार आहे. कमलनयन बजाज इंजिनीअर कॉलेजचा नामकरण सोहळा आणि ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इमारतीचे उद्घाटन हे जेटलींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी आज रात्रीच जेटली पवारांच्या बंगल्यावर मुक्कामी राहणार आहे. रात्री संपूर्ण पवार कुटुंबियांसोबत जेटली जेवण घेणार आहे. यासाठी संपूर्ण पवार कुटुंबियासह अजित पवार, सुप्रीया सुळे हजर राहणार आहे. विशेष म्हणजे, व्हेंलटाईन डेला पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीच्या दौर्‍यावर आले होते. आता त्यानंतर अरूण जेटली पवारांच्या घरी मुक्कामी असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 16, 2015 06:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close