S M L

प्रतापगड 355 मशालींनी उजाळला

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2015 05:04 PM IST

प्रतापगड 355 मशालींनी उजाळला

17 ऑक्टोबर : शिवाजी महाराजांचा आणि त्यांचा मावळ्याचा पराक्रमाचा साक्षीदार असणारा प्रतापगड किल्ला 355 मशालींचा प्रकाशाने उजळून निघाला. या गडावरील भवानीमातेच्या मंदिराला 350 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवरात्रोत्सवात चतुर्थी दिवशी इथं मशाली पेटवल्या जाऊ लागल्या आणि गेली पाच वर्षे ही परंपरा सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले कित्येक पराक्रम या किल्ल्याशी जोडलेले आहेत. शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीमध्ये सापडणार्‍या शाळीग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवून गडावर तिची स्थापना केली या घटनेला 2011 मध्ये 350 वर्षे पूर्ण झाल्यानंतर गडावर 350 मशाली पेटविण्यात आल्या. आता दरवर्षी या मशालींमध्ये एका मशालीची वाढ होते. या महोत्सवासाठी अनेक दिवसांपासून या भागातील तरुण कामाला लागलेले असतात. ही परंपरा सुरु होवून 5 वर्षं झाली असली तरी हा मशाल महोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्राचा कानाकोपर्‍यातून शिवप्रेमी या ठिकाणी मोठ्या संखेने आपली हजेरी लावतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2015 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close