S M L

20 लाखांच्या खंडणीसाठी तरुणाची निर्घृण हत्या

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2015 05:23 PM IST

20 लाखांच्या खंडणीसाठी तरुणाची निर्घृण हत्या

17 ऑक्टोबर : 20 लाखांच्या खंडणीसाठी 18 वर्षीय तरुणांचे अपरहण करुण हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीये. मूळचा मालेगाव चा राहणार मोहितेश बविस्कर असे या युवकाचे नाव आहे.

मालेगाव येथे व्यावसायिक प्रलिन बविस्कर यांचा मोहितेश हा मुलगा, शिक्षणासाठी नाशिक येथेल हॉस्टेलमध्ये राहत होता,दोन दिवसांपूर्वी त्यांची मिसिंग झाल्याची तक्रार त्यांच्या घरच्यानी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली होती. 15 तारखेला दिवसभरात मोहित बाविस्कर यांच्या मोबाईलहुन त्याच्या वडिलांना 3 वेळा 20 लाख रूपयांची मागणी करणारा फोन आला. मात्र, काही वेळा नंतर फोन बंद झाला आणि काल सकाळी त्र्यंबकेश्वर येथील सापगावमध्ये तरुणाचा बेवारस मृतदेह आढळून आला. सापडलेला मृतदेह हा मोहितेशचा असल्याचे तपासात निष्पण झालं. अपहरण करून खून केल्याचा गुन्हा त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

तपास कामात पोलिसांनी तत्परता दाखवली नाही म्हणून मोहितेशची हत्त्या झाल्याचे नातेवाईकांचं म्हणणं आहे. एकूणच नाशिक मध्ये गेल्या काही महिण्यापासून गुन्हाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हत्या,हाणामार्‍यामुळे दीड वर्षा पूर्वी अशाच पद्धतीने बिपीन बाफना या युवकाची अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2015 05:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close