S M L

शरद पवार हे न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान, राहुल बजाज यांची स्तुतीसुमनं

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2015 06:13 PM IST

शरद पवार हे न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान, राहुल बजाज यांची स्तुतीसुमनं

17 ऑक्टोबर : शरद पवार हे न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान आहे अशी स्तुतीसुमनं उद्योगपती राहुल बजाज यांनी उधळली. ते बारामतीत बोलत होते.

कुणी काहीही म्हणो उद्योग असो, राजकारण असो काही टीका टीप्पणी होतच राहते. पण, शरद पवार हे माझे चांगले मित्र राहिले आहे. त्यामुळे ते न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान असेच आहे असंही राहुल बजाज म्हणाले.

आज बारामतीत इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीचा नामकरण सोहळा पार पडला. या इमारतीला कमलनयन बजाज याचं नाव देण्यात आलंय. यावेळी राहुल बजाज यांनी पवारांचं तोंडभरून कौतुक केलं. या कार्यक्रमात राहुल बजाज यांनी पवारांचं तोंडभरून कौतुक केलं. यावेळी व्यासपीठावर शरद पवार, अर्थमंत्री अरुण जेटली उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2015 06:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close