S M L

नागपुरात माथेफिरु पतीने पत्नी आणि भाच्याचा केला निर्घृण खून

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2015 08:33 PM IST

नागपुरात माथेफिरु पतीने पत्नी आणि भाच्याचा केला निर्घृण खून

17 ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर आता दिवसेंदिवस गुन्हेगारीचं शहर बनत चाललंय. शहरात आज दुपारी एका माथेफिरु पतीने आपल्या पत्नीचा आणि भाच्याचा कुर्‍हाडीने वार करून खून केल्याची घटना घडलीय.

साठ वर्षीय शरणु कांबळे नावाच्या या नराधमाने आपली पत्नी गोपीबाई कांबळे आणि 9 वर्षांच्या भाचा चेतन रामपुरे या दोघांवर कुर्‍हाडीने अतंत्य अमानुषपणे हल्ला केला. यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

या खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, पण पैशावरून पत्नीसोबत झालेल्या वादावरून हे खून झाले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2015 08:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close