S M L

96 व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गंगाराम गवाणकर यांची निवड

Samruddha Bhambure | Updated On: Oct 18, 2015 05:09 PM IST

96 व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गंगाराम गवाणकर यांची निवड

3518 ऑक्टोबर : 96 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

'वस्त्रहरण' या गाजलेल्या नाटकाचं लेखन गवाणकर यांनी केलं आहे. 'वस्त्रहरण'नंतर गवाणकरांनी 'दोघी', 'वन रूम किचन', 'वात्रट मेले' यांसारख्या नाटकं त्यांनी लिहिली आहेत. मालवणी भाषेला रंगमंचावर आणण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. गवाणकर यांच्या निवडीबद्दल नाटय़-सिने क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याआधी बेळगावमध्ये झालेल्या 95 व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद फैयाज शेख यांनी भूषवलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 18, 2015 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close