S M L

मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटणार?

Samruddha Bhambure | Updated On: Oct 19, 2015 11:32 AM IST

मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटणार?

19 ऑक्टोबर : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधले पाणी मराठवाड्याला सोडण्यास तीव्र विरोध होतोय. याविरोधात आज (सोमवारी) नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात आंदोलनं करण्यात येणार आहे. गंगापूर धरणातील पाणी वहन मार्गाने घेऊन जाण्यास आपला तीव्र विरोध असून धरणातलं एक थेंबही पाणी मराठवाड्याला देणार नसल्याचं शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी काल (रविवारी) स्पष्ट केलं होतं. त्यामुळे नाशिक आणि मराठवाड्यातील पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हं निर्माण झाले आहेत.

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय शनिवारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडायला उत्तर महाराष्ट्रातल्या नेत्यांचा विरोध आहे. शिवसेना आमदार अनिल कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहेत. मराठवाड्याला पाणी सोडणं आमच्यासाठी धक्कादायक असून गंगापूर धरणावर आंदोलन करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. मराठवाड्याला पाणी सोडण्याला तीव्र विरोध करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. विषय समजून घेतल्याशिवय पाणी सोडू देणार नसल्याचा इशाराही अनिल कदम यांनी दिला आहे.

दरम्यान या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी सोमवारी सकाळी अकराला गंगापूर धरणावर आंदोलन करण्यात येणार आहे. तर या निर्णया विरोधात उद्या 12 वाजता संगमनेर प्रान्त कार्यालयावर काँग्रेस नेते आणि माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. तसंच दुपारी 4 वाजता अकोले येथे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वात कोल्हार घोटी मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2015 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close