S M L

भाजपच्या जाहिरातीत चक्क आयुक्तांचा फोटो, आयुक्तांनी बजावली नोटीस

Sachin Salve | Updated On: Oct 19, 2015 03:38 PM IST

भाजपच्या जाहिरातीत चक्क आयुक्तांचा फोटो, आयुक्तांनी बजावली नोटीस

19 ऑक्टोबर : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपनं चक्क महापालिका आयुक्तांनाच उतरवलंय. महापालिका आयुक्त ई.रविंद्रन हे इमानदार,मेहनती, उत्साही आहेत म्हणून भाजपला बहुमताने विजयी करा असं आवाहनच भाजपने केलं. त्यामुळे आता आयुक्तांनी भाजपला नोटीस बजावलीये.

महापालिका आयुक्त ई.रविंद्रन यांना कल्याण डोंबिवली महापालिकेचा विकास ई रविंद्रन यांच्या माध्यमातून करणार असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत दिल्या आहेत. या आधी भाजपच्या 'व्होट फॉर कल्याण डोंबिवली, अबकी बार भाजप सरकार' या फेसबुक पेजवर फोटो झळकला होता. त्यामुळे ई.रविंद्रन यांनी भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांना नोटीस बजावली आहे. तीन दिवसांत याबाबत खुलास करावा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही नोटिसीत देण्यात आलाय. दरम्यान, अशा पद्धतीनं प्रचार करणं म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्यानं यावर शिवसेना निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2015 03:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close