S M L

मानव यांना मानसोपचार आणि विश्रांतीची गरज -अभय वर्तक

Sachin Salve | Updated On: Oct 19, 2015 09:16 PM IST

ABHAY VARTAK19 ऑक्टोबर :देवेंद्र फडणवीस सनातन संस्थेच्या हिटलिस्टवर आहेत हा श्याम मानव यांनी केलेला आरोप प्रसिद्धीच्या हव्यासापोटी असून त्यांना मानसोपचार आणि विश्रांतीची गरज आहे असा पलटवार सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला.

सनातन संस्थेवर, पुरोगामी विचारवंतांच्या हत्येमुळे सातत्याने आरोप होत असल्याने त्याच उत्तर देण्यासाठी संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी सांगली येथे पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी श्याम मानव आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीची सी.आय.डी. मार्फत चोकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. या संस्थेला विदेशातून पैसे मिळत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी शरद पवारांना जर इतके प्रेम वाटत असेल तर त्यांनी सावरकरांचा प्रखर हिंदू राष्ट्रवाद मांडावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. साहित्यिक जे पुरस्कार परत करत आहेत यावर बोलताना अभय वर्तक म्हणाले की, त्यांनी केवळ पुरस्कारच परत करू नयेत तर 10 टक्के सवलतीतून या साहित्यिकांनी घरे मिळवली आहेत तीही परत करावीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2015 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close