S M L

'झुकल्या होत्या यांच्या गर्विष्ठ माना...', शिवसेनेचा भाजपला टोला

Samruddha Bhambure | Updated On: Oct 21, 2015 01:09 PM IST

'झुकल्या होत्या यांच्या गर्विष्ठ माना...', शिवसेनेचा भाजपला टोला

21 ऑक्टोबर :  शिवसेना भाजपमध्ये दिवसेंदिवस दरी वाढतच चालली आहे. आज पुन्हा एकदा शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून भाजपवर थेट निशाणा साधला. शिवसेनाभवन परिसरात शिवसेनेकडून 'बाळासाहेबांसमोर माना झुकवणारे नेते जुने दिवस कसे विसरले?', असा सवाल उपस्थित करणारं होर्डिंग लावलं होतं आलं होतं. मात्र या पोस्टरवर टीका होताच तासाभरातच हे पोस्टर काढून टाकण्यात आलं आहे. तसंच 'ती होर्डिंग अधिकृत नसून कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात तशी होर्डिंग लावली असावी, अशी सारवासारव शिवसेनेने केली आहे.

शिवसेना भवन परिसरात शिवसेनेने हे पोस्टर लावले होते. 'विसरले ते दिवस कसे हे, की ढोंग वरकरणी, झुकल्या होत्या यांच्या गर्विष्ठ माना साहेबांच्या चरणी!'अशा प्रकारची पोस्टरबाजी करीत सेनेने भाजपवर बोचरी टीका केली आहे. शिवसेना आणि बाळासाहेबांमुळे भाजपचे अस्तित्व महाराष्ट्रात आहे. असं दाखविण्याचा सेनेकडून पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आला आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता जरी असली तरी राज्यात आपणच मोठा भाऊ असल्याचे दाखवण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला आहे.

या पोस्टरमध्ये पंतप्रधान आणि बाळासाहेबांच्या फोटोसह, स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांनी बाळासाहेबांच्या घेतलेल्या भेटीचे फोटोही लावण्यात आले आहेत.

दरम्यान, या पोस्टरमुळे शिवसेना-भाजपातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2015 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close