S M L

आम्ही 'सामना'तून भूमिका मांडतो, 'ते' पोस्टर अधिकृत नाही : शिवसेना

Sachin Salve | Updated On: Oct 21, 2015 05:12 PM IST

shiva sena 121 ऑक्टोबर : शिवसेनाभवनासमोरचं भाजपला डिवचणारं ते वादग्रस्त पोस्टर अखेर काढून टाकण्यात आलंय. हे पोस्टर म्हणजे शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही. आम्हाला भूमिका मांडायची असली तर ती 'सामना'मधून मांडण्यात येते अशी सारवासारव शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

या पोस्टरमध्ये भाजपमध्ये स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून ते थेट नरेंद्र मोदींपर्यंत शिवसेना प्रमुखांसमोर कसे झुकले होते, यासंबंधीचे फोटोच लावण्यात आले होते.

"झुकल्या होत्या त्यांच्या गर्विष्ठ माना...बाळासाहेबांच्या चरणी", असा त्या पोस्टरचा मथळा होता. पण या पोस्टरवर टीका होताच तासाभरातच हे पोस्टर काढून टाकण्यात आलं. पोलिसांकरवी हे पोस्टर काढण्यात आलंय.

पोस्टर काढल्यामुळे हा वाद तात्पुरता मिटला असला तरी यानिमित्ताने सेना- भाजपातल्या कुरघोडीचं राजकारण आत्ताच कुठल्या थराला जाऊन पोहोचलं हे स्पष्ट होतंय. दरम्यान, हे पोस्टर्स म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात तसे पोस्टर्स लावले असावेत, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2015 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close