S M L

धाडसत्र सुरुच, ठाण्यात 120 कोटींचं कडधान्य जप्त

Sachin Salve | Updated On: Oct 22, 2015 06:15 PM IST

धाडसत्र सुरुच, ठाण्यात 120 कोटींचं कडधान्य जप्त

22 ऑक्टोबर : साठेबाजांविरुद्ध धाडसत्र सुरूच आहे. आज (गुरुवारी) ठाण्यातून 120 कोटींचं कडधान्य जप्त करण्यात आलंय. शिळ डायघर भागात पुरवठा विभाग आणि ठाणे पोलिसांनी छापा घालून पाच गोडावून मधून जवळपास 120 कोटींचे कडधान्य जप्त केलंय.

सणांच्या तोंडावर डाळींचे भाव वाढले असताना झालेल्या या कारवाईमध्ये तूर, मुग, वाटाणा, चना मसूर या डाळींचा समावेश आहे. अशा पद्धतीने शिळ डायघर भागात मोठ्या प्रमाणात अवैध गोडावून आहेत त्यामध्ये चामुंडा वेयर हाऊस , भानुशाली ,आरपी,

त्रिमूर्ती आणि लक्ष्मी वेयर हाईस यामध्ये हा साठा करण्यात आला होता.

या प्रकारात अजय चांदे, मितेश कटारिया,भानुशाली आणि आणखी दोन आरोपींवर अत्यावश्यक वस्तूंच्या कायद्यानुसार डायघर पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल केले असून त्याचा तपास ठाणे पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2015 04:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close