S M L

दिवाळीआधी दिवाळं, फराळ बजेट कोलमडलं

Sachin Salve | Updated On: Oct 22, 2015 05:01 PM IST

दिवाळीआधी दिवाळं, फराळ बजेट कोलमडलं

22 ऑक्टोबर : अचानक तूरडाळीच्या किंमतीत वाढल्यामुळे महागाईत सर्वसामान्यांचं कंबरड मोडलं गेलंय. त्यातच दिवाळीचा सण तोंडावर असल्यामुळे फराळ बनवण्याचं बजेट कोलमडलंय.

दिवाळी जवळ येऊन ठेपली आहे. दिवाळीतील चकली, शेव, बेसन लाडू, बूंदी लाडू असे पदार्थ बनवताना डाळींचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. पुण्यातील मार्केटयार्ड भागात दसर्‍याच्या जवळपास गिर्‍हाईकांची दिवाळी फराळ बनवण्याचा माल खरेदी करायला गर्दी व्हायची. पण, यावर्षी दिवाळी तोंडावर येऊन ठेपली तरी दुकानात शांतता आहे. यावर्षी डाळींचं उत्पन्नच घटल्यामुळे त्याचा फटका व्यापार्‍यांनाही बसतोय. त्याचबरोबर दिवाळीतील फराळासाठी आवश्यक किराणाही गेल्या वर्षीच्या तुलनेत महागलाय.

दरम्यान, साठेबाजांवर कारवाई होत असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर डाळ जप्त होत असल्यामुळे आतातरी डाळींचे दर कमी होतील का हाच ग्राहकांचा प्रश्न आहे. ज्या गतीने दर वाढले, त्या गतीने हे दर कमी होणार नाहीत असं जाणकारांचं म्हणणं आहे.

पुणे : किरकोळ बाजारातले दर

साखर : 30 रु. किलो

तूरडाळ : 220 रु. किलो

हरभरा डाळ : 65-70 रु. किलो

मूगडाळ :120-130 रु. किलो

सुकं खोबरं :180-210 रु. किलो

बेसन : 90 रु. किलो

शेंगदाणा - 110 रु. किलो

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2015 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close