S M L

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पूर्ण सुरक्षा- चिदंबरम्

1 फेब्रुवारीपाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारतात संपूर्ण सुरक्षा दिली जाईल, असं आश्वासन कें द्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी दिलंय. दिल्लीतल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिलीय. ऑस्ट्रेलियात भारतीय नागरिकांवर होणारे हल्ले थांबत नाही तोपर्यंत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना महाराष्ट्रात खेळू देणार नाही, अशी धमकी काही दिवसांपूर्वी शिवसेनेनं दिली होती. तसंच पाकिस्तानी खेळाडूंनाही भारतात खेळण्याविषयी बराच वाद रंगलाय. त्या पार्श्वभूमीवर चिदंबरम् यांचं हे आश्वासन महत्त्वाचं मानलं जातंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2010 03:32 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2010 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close