S M L

राजापूर अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी दोन आरोपींना अटक

Sachin Salve | Updated On: Oct 23, 2015 10:39 PM IST

राजापूर अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी दोन आरोपींना अटक

23 ऑक्टोबर :  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात एका 15 वर्षांच्या मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना उजेडा आलीये. आयबीएन लोकमतने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर संध्याकाळी आरोपी सुभाष जाधव आणि सयाजी जाधव या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहे. दोन्ही आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली.

राजापूर तालुक्यातल्या पांगरी गावात झालेल्या या अल्पवयीन मुलीवरच्या बलात्कार प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आयबीएन लोकमतची टीम थेट पांगरी गावात पोहोचली. आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यानी या प्रकरणातले 3 संशयितांपैकी पोलीस पाटील असलेल्या सयाजी जाधव यांच्या नातेवाईकाना गाठले. मात्र सयाजी जाधव हे घरात नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर या पीडित मुलीच्या घरी तिच्या आजीचीही भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गावातले कुणीही या प्रकरणाबाबत काहीही बोलायला तयार नाहीत.दरम्यान, पीडित मुलगी सध्या मुंबईमध्ये आहे, आणि तिच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांनी घेतलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2015 10:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close