S M L

राहुल उतरले 'मराठी'च्या आखाड्यात : सेनेनेही कसली कंबर

2 फेब्रुवारीमराठी- अमराठीच्या वादात आता काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी उतरलेत. त्यामुळे आता यावरून चांगलाच धुराळा उडालाय. यावरून शिवसेनेने राहुल यांच्यावर जोरदार टीका केलीय. पण राहुल गांधी आपल्या मतांवर ठाम आहेत. केवळ महाराष्ट्रच नाही तर पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यांचा विकास युपी, बिहारमधल्या लोकांमुळेच झालाय, असं त्यांनी पुन्हा म्हटलंय. 26/11च्या हल्ल्यापासून मुंबईचं संरक्षण युपी, बिहारी कमांडोंनीच केले. त्यावेळी उत्तर भारतीयांनी मुंबई सोडावी, असं बाळासाहेब ठाकरे का म्हणाले नाहीत, असा सवाल त्यांनी केलाय. तसेच आता महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवरचे हल्ले सहन केले जाणार नाहीत, दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. तर राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे मुंबई हल्ल्यातल्या शहिदांचा अपमान झाल्याचं शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी 'सामना'त म्हटलंय. मुंबईवर हल्ला झाला तेव्हा राहुल कुठे होते? त्यांच्या काँग्रेस सरकारनं हल्ला रोखण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? असे प्रश्न उद्धव यांनी विचारलेत. मराठीचं तेज अजून राहुल गांधींना कळलेले नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी पं. नेहरुंनाही महाराष्ट्रात पाय ठेवणे मुश्कील झाले होते, अशी आठवण शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी करून दिलीय. तर आता या मुद्द्यावरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणा-यांवर कडक कारवाई करू, असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2010 09:23 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2010 09:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close