S M L

पाण्यात पाहणारे नेते पाण्यासाठी एकत्र !

Sachin Salve | Updated On: Oct 24, 2015 01:53 PM IST

पाण्यात पाहणारे नेते पाण्यासाठी एकत्र !

24 ऑक्टोबर : ऐरव्ही एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते आता जायकवाडीच्या पाण्यावरुन एकत्र येताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत नगरला काँग्रेस -राष्ट्रवादीची बैठक पार पडली. बैठकीला मधुकर पिचड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नगरच्या पाण्यासाठी रणनीती ठरवण्यात आली. सर्वपक्षीय शिष्टमंडळसह लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यावेळी विखे पाटलांनी पाण्यावरून प्रादेशिक वाद वाढत असल्यानं सरकारला निश्चित भूमिका घ्यावी लागेल, असं म्हटलंय. पाणी वाटपाला हिंसक वळण लागू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलीय. नोकरशाहीला डोक्यावर बसून ठेवलंय. नोकरशहा भूमिका घेणार आणी आम्ही पाहत रहायचं का ? असा सवालही विखेंनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 24, 2015 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close