S M L

'गरुडा एअरवेज' भारतात का असू शकत नाही ?-भागवत

Sachin Salve | Updated On: Oct 24, 2015 02:01 PM IST

mohan bhagwat24 ऑक्टोबर : दक्षिण-पूर्व आशियात 'गरुडा एअरवेज' नावाची विमानसेवा आहे. पण, आपल्या देशातल्या संस्कृतीनुसार असं नाव ठेवण्याचा विचारही आपण करू शकत नाही, अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बोलून दाखवलीय.

भारतीयांनी प्राचीन काळापासून अनेक शोध लावले. पण त्याचा उल्लेख संस्कृतीनुसार टीकू शकला नाही. हे शोध जगाने स्वीकारलेत. पण त्याची नावं बदलली असंही भागवत म्हणाले. नागपूरच्या धरमपेठ कॉलेजच्या वतीने आयोजीत 'रिझॉनसेस ऑफ अँशियंट इंडियन कल्चर इन द वर्ल्ड' या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 24, 2015 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close