S M L

IBN लोकमतचा दणका, 'तो' आदेश अखेर गुंडाळला

Sachin Salve | Updated On: Oct 24, 2015 07:02 PM IST

jayakwadi dam_news24 ऑक्टोबर : मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या आदेशात कशा चुका आणि लबाड्या आहेत याचा पर्दाफाश आयबीएन लोकमतने केला होता. अखेर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आपल्या खात्याची चूक मान्य केली आहे. एवढंच नाही, तर त्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांची तातडीची बैठकही बोलवलीय. त्याचबरोबर, याबाबत सुधारित आदेश काढा, असे आदेशही त्यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत महाजन यांनी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल IBN लोकमतचे धन्यवादही मानले.

मराठवाड्याला 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झालाय. पण हा आदेशच दिशाभूल करणारा होता. पण, गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या या धक्कादायक आदेशात अनेक चुका आहेत. फक्त चुकाच नाहीत, तर लबाडी आणि फसवणूक सुद्धा आहे. या अहवालात खोटी आकडेवारी दाखवून धरणसाठ्यात वाढ दाखवण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर चक्क धरणाचं लोकेशन बदलण्याची गंभीर चुकही पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी केली आहे. विशेष म्हणजे हाच अहवाल हायकोर्टातही सादर करण्यात आलाय, म्हणजेच कोर्टाची दिशाभूल करण्याचे प्रतापही या अधिकार्‍यांनी केला.

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि दारणा या 2 धरणसमुहातून 12.84 टीएमसी पैकी 4.60 टीएमसी पाणी जायकवाडीला सोडलं जाणार आहे. गंगापूर धरणसमुहात गंगापूर,गौतमी,काश्यपी आणि आळंदी हे धरण येतात आणि दारणा धरणसमुहात कडवा,भाम,भावली,वाकी,दारणा,मुकणे आणि वालदेवी हे धरण येतात. या अंतिम आदेशात मात्र गंगापूर धरणसमुहात असलेल्या आळंदी धरणाचं लोकेशन बदलून चक्क दारणा समुहात टाकण्याची घोडचूक पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी केली आहे. ही चूक केल्यानं उपलब्ध पाणीसाठा आणि यावर आधारीत पाणीसाठा याची आकडेवारीच बदलली आणि या गंभीर चुकीमुळं नाशिक जिल्ह्यातून चक्क 2 टीएमसी पाणी हे अतिरीक्त सोडलं जाणार आहे. मात्र, आयबीएन लोकमतच्या बातमीची दखल घेत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी नव्याने आदेश काढण्याचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 24, 2015 07:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close