S M L

ओवेसींच्या कल्याणमधील सभेला परवानगी नाकारली

Sachin Salve | Updated On: Oct 24, 2015 09:10 PM IST

mim asaduddin owaisi24 ऑक्टोबर : कल्याण-डोंबिवली महाापालिका निवडणुकीत नवं वळण लागलंय. एमआयएमचे प्रमुख असादुद्दीन ओवेसी यांच्या कल्याणमधल्या सभेला परवानगी नाकारली आहे. त्यांना भिवंडी आणि पुण्यातही पोटनिवडणुकांसाठी परवानगी नाकारली आहे.

जात आणि धर्मावर आधारावर प्रचार करून लोकभावना भडकविण्याचा प्रयत्न एमआयएम करतंय, असा आरोप करण्यात आला. आचारसंहिता पथकाने एमआयएमचा कार्यकर्ता जावेद डोन याच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आपले मुस्लीम मतदार जास्त आहेत. आपला उमेदवार निवडून आलेच पाहिजे अशी क्लिप फिरत आहे. ही क्लिप आता समोर आल्यानंतर पोलिसांनी पक्षाचा कार्यकर्ता जावेद डोन च्या विरोधात आचारसंहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि सदर प्रकरणी तपास सुरु आहे.

याच वेळी पोलिसांनी असादुद्दीन ओवेसी याना कल्याण शहरात प्रवेश करण्याबाबत मनाई हुकुम बजावला असून, त्यांच्या जाहीर सभेला सुद्धा पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. एमआयएमवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कल्याण येथील बाजार पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय. निवडणूक आयोगाचे आचारसंहिता कक्ष प्रमुख जमीर लेंगरेकर यांनी ही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 24, 2015 09:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close