S M L

शिवसेनेचा 'वचननामा' जाहीर, टोलमुक्त कोल्हापूरचं दिलं आश्वासन

Samruddha Bhambure | Updated On: Oct 25, 2015 07:07 PM IST

êËêËêÖêêêËÖêy

25 ऑक्टोबर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी  शिवसेनेचा 'वचननामा' आज जाहीर करण्यात आला आहे. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय. त्यामध्ये कोल्हापूर टोलमुक्त करण्याचं आश्वासन पुन्हा एकदा शिवसेनेकडून देण्यात आलं आहे.

कोल्हापूर मनपाच्या या निवडणुकीत 81 जागासांठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रस हे पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहेत तर भाजपनं स्थानिक ताराराणी आघाडीशी युती केलीये.

दरम्यान, कोल्हापूरात वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला, या निमित्तानं कोल्हापूरात शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. शिवसेनेचा धनुष्यबाण ध्येय जपतो असं सांगत या वचननाम्यातून शिवसेनेनं तिर्थक्षेत्र विकास, रंकाळा तलावात शिवरायांचं स्मारक, शाहू महाराजाचं स्मारक, यासोबतच आयटी पार्क आणि कला क्रिडा याच्या माध्यमातून युवकांचा विकास करण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 25, 2015 07:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close