S M L

नालासोपार्‍यामध्ये चाळ व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

Sachin Salve | Updated On: Oct 26, 2015 08:32 AM IST

नालासोपार्‍यामध्ये चाळ व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

26 ऑक्टोबर : मुंबईजवळ नालासोपार्‍यामध्ये एका चाळ व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय आहे.

संजय मार्तंड असे या चाळ व्यावसायिकाचे नाव असून नालासोपारा परिसरात चाळी बांधण्याचं आणि रियल इस्टेटमध्ये दलालीचं संजय मार्तंड काम करत होता. संध्याकाळी सातच्या सुमारास मार्तंड राहत असलेल्या बिल्डींगजवळ एका अज्ञात व्यक्तीनं संजय मार्तंडवर गोळ्या झाडल्या.

सध्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मार्तंडचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.पोलिसांच्या हाती काही सूत्रे लागली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2015 08:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close