S M L

कुख्यात डॉन छोटा राजनला इंडोनेशियात अटक, गृहमंत्रालयाकडून दुजोरा

Sachin Salve | Updated On: Oct 26, 2015 08:13 PM IST

कुख्यात डॉन छोटा राजनला इंडोनेशियात अटक, गृहमंत्रालयाकडून दुजोरा

Rajan arrest banner

26 ऑक्टोबर : गुन्हेगारी विश्वातील कुख्यात डॉन छोटा राजन उर्फ राजन सदाशिव निकाळजे याच्या अटकेबाबतचा संभ्रम अखेर दूर झाला आहे. इंडोनेशियामध्ये अटक करण्यात आलेली व्यक्ती म्हणजे छोटा राजनच आहे, असा दुजोरा सीबीआयच्या संचालकांनी दिला आहे. इतकंच नाही तर इंटरपोलने छोटा राजनला पकडल्याचा फोटो इंडोनेशियातून प्रसिद्ध केला आहे.

55 वर्षीय राजन हा भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक आहे. गेल्या दोन दशकापांसून सुरक्षा यंत्रणांना तो सतत गुंगारा देत होता. इंटरपोलनेही राजनचा मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश केला होता. अनेक गँगवॉरमध्ये छोटा राजनचा हात आहे. मात्र ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या माहितीवरून त्याला इंडोनेशिन पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही छोटा राजनला इंडोनेशियात ताब्यात घेण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सिबीआयचं अधिकृत माहितीपत्र

सीबीआयच्या विनंतीवरुन 25 ऑक्टोबरला बाली पोलिसांनी भारतीय वंशाच्या, मोहन कुमार असं नाव सांगणार्‍या व्यक्तीला अटक केली. मोहन कुमार उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन हा फरार आरोपी असून, सीबीयानं ऑस्ट्रेलियन सरकारसोबत त्याच्यासंदर्भात सातत्यानं पाठपुरावा केला. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियन सरकारच्या सहकार्यामुळे ही अटक झाली आहे. आमच्या विनंतीवर कारवाई केल्याबद्दल आम्ही इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाचे आभारी आहोत. कायद्यानूसार पुढची कारवाई केली जाईल.

राजनाथ सिंहांची दुजोरा

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही छोटा राजनला इंडोनेशियात ताब्यात घेण्यात आल्याच्या वृत्ताला  दुजोरा दिली आहे. आम्ही इंटरपोलच्या संपर्कात आहोत अटक झालेला व्यक्ती छोटा राजन असून आम्ही इंडोनेशिया आणि इंटरपोलचं अभिनंदन करतो, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2015 06:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close