S M L

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 45 माजी संचालकांकडून होणार 147 कोटींची वसुली

Sachin Salve | Updated On: Oct 27, 2015 08:16 AM IST

Image img_228122_kol_kdcc_bank_15_34_240x180.jpg27 ऑक्टोबर : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 45 आजी माजी संचालकांवर कारवाई होणार आहे. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. या संचालकांकडून 147 कोटी रुपयांंची वसुली करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

त्यामुळे कोल्हापुरमधल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना हा दणका आहे. संचालक मंडळानं 2002-2007 नियमबाह्य आणि चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप केल्याचा ठपका आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 88 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. रक्कम वसुलीसाठी 45 संचालकांना नोटीसही देण्यात येणार आहे.महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं कारवाईचा बडगा उगारलाय.

या संचालकांना वसुलीची नोटीस

प्रकाश कल्लपा आवाडे - 69 लाख 91 हजार रु.

विनय कोरे - 30 लाख 29 हजार रु.

महादेव रामचंद्र महाडिक - 4 कोटी 50 लाख रु.

संदीप अरुण नरके- 1 कोटी 35 लाख रु.

भाग्येशराव उर्फ भैयासाहेब कुपेकर - 4 कोटी 90 लाख रु.

मानसिंग गायकवाड - 5 कोटी 74 लाख रु.

नरसिंग गुरुनाथ पाटील- 5 कोटी 74 लाख रु.

संजय सदाशिव मंडलिक - 5 कोटी 54 लाख रु.

राजलक्ष्मी दिग्विजय खानविलकर - 4 कोटी 90 लाख रु.

निवेदिता माने- 3 कोटी 45 लाख रु.

राजू जयवंतराव आवळे - 43 लाख रु.

हसन मुश्रीफ - 5 कोटी 74 लाख रु.

ए. वाय. पाटील - 5 कोटी 56 लाख रु.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2015 08:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close