S M L

इस्थर अनुह्या खून प्रकरणाचा आज फैसला

Sachin Salve | Updated On: Oct 27, 2015 03:39 PM IST

इस्थर अनुह्या खून प्रकरणाचा आज फैसला

27 ऑक्टोबर : सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या इस्थर अनुह्या च्या खून प्रकरणी आज कोर्ट निकाल देणार आहे. या प्रकरणी आरोपी चंद्रभान सानपवर खुनाचा आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे.

23 वर्षांची इस्थर अनुह्या हैदराबादला राहणारी होती. 5 जानेवारी 2014 च्या पहाटे ती हैदराबादहून ट्रेनने कुर्ला टर्मिनसला आली. पण कुर्ला टर्मिनसवर उतरल्यापासून तिचा काहीच पत्ता लागला नव्हता. 10 दिवसांनी तिचा मृतदेह कांजुरमार्ग ते भांडुप दरम्यान इस्टर्न एक्स्प्रेस वे लगतच्या झुडपामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता.

यानंतर सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चंद्रभान सानप याला अटक करण्यात आली. चंद्रभान सानप हा भांडुपचा रहिवासी आहे. आणि त्याच्यावर रेल्वेमध्ये चोर्‍या करणे, दरोडे घालण्याचे खटले दाखल आहेत. चंद्रभानने इस्थर अनुयाला गाठून तिला रिक्षामधून एक्स्प्रेस हायवेवर नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. या भयंकर घटनेनंतर आता त्याला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2015 09:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close