S M L

'बेस्ट'चा संप तुर्तास टळला

Sachin Salve | Updated On: Oct 27, 2015 11:30 AM IST

best_bus3427 ऑक्टोबर : मुंबईच्या बेस्ट बसच्या कर्मचार्‍यांनी बोनसच्या मागणीसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. पण सध्यातरी हा संप टळला आहे.

3 नोव्हेंवरला बेस्ट समितीची बैठक होणार असून त्यात बोनसबाबत प्रस्ताव आणण्याचं बेस्टच्या महा-व्यवस्थापकांनी आश्वासन दिलं आहे.

त्या आश्वासनावर बेस्ट प्रशासनाला आणखी काही दिवस देण्याचा निर्णय कृती समितीनं घेतला असल्याची माहिती बेस्ट कर्मचारी सेनेचे नेते सुहास सामंत यांनी दिलीय.

पण त्या दिवशी निर्णय न झाल्यास संपावर जाण्याशिवाय दुसरा पर्याय कर्मचार्‍यांकडे राहाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2015 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close