S M L

आता पुढचं लक्ष्य डी गँग, मुख्यमंत्र्यांचा दावा

Sachin Salve | Updated On: Oct 27, 2015 11:47 AM IST

आता पुढचं लक्ष्य डी गँग, मुख्यमंत्र्यांचा दावा

27 ऑक्टोबर : छोटा राजनची अटक ही महत्वपूर्ण घटना आहे. त्याच्या अटकेमुळे गुन्हेगारी विश्वासाची बरीच माहिती हातात लागणार आहे. राजनच्या अटकेनंतर डी गँगच काय तर दाऊद इब्राहिमलाही अटक करण्यासाठी प्रयत्न करणार असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. आयबीएन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी दाऊदच्या अटकेबाबत सुतोवाच केला.

छोटा राजनच्या बेकायदेशीर कारवायांचं साम्राज्य महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पसरलंय. त्यामुळेच त्याला झालेली अटक महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच गेल्या काही दिवसांपासून छोटा राजनच्या अटकेसंदर्भात केंद्र सरकारची मोहिम सुरू होती. मुंबई पोलिसांनी राजनबाबत आवश्यक असलेली सर्व माहिती पुरवली होती. राजनवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहे. या प्रकरणांमध्ये चौकशीसाठी राजनला महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी केंद्राला विनंती केली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. परंतु, राजनवर त्याच्यावर खटला भरण्यात येईल की त्याला माफीचा साक्षीदार करण्यात येईल या प्रश्नावर मात्र त्यांनी काहीही प्रतिक्रिया द्यायचं टाळलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2015 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close