S M L

वसईत प्रियकराने केली प्रेयसी आणि मुलाची निर्घृण हत्या

Sachin Salve | Updated On: Oct 27, 2015 12:28 PM IST

वसईत प्रियकराने केली प्रेयसी आणि मुलाची निर्घृण हत्या

27 ऑक्टोबर : वसईत एका महिलेची आणि तिच्या मुलाची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीये.

आज पहाटे 4 च्या सुमारास ही घटना घडली. किरणकुमार मकवाना असं या आरोपीचं नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

राग किती विकोप्याला जाऊ शकतो याचं उदाहरण वसईत घडलंय. सहा महिन्यांपूर्वीपर्यंत किरणकुमार मकवाना हा आपल्या दोन मुलांसह सोनाली, तिचा नवरा राजकुमार आणि मुलगा कुणाल चव्हाण (वय 14) यांच्यासोबत वसईच्या एव्हरशाईन इमारतीतल्या घरात राहात होते. हे सगळे एकत्रच राहात होते. पण, सोनालीचा नवरा राजकुमार आणि मकवाना यांच्यात वाद झाल्याने मकवाना आपल्या मुलांसोबत घरातून निघुन गेला होता. सोनाली हिचे किरण मकवाना सोबत प्रेमसंबंधही होते. मात्र, काल सोमवारी सोनाली आणि किरणकुमार मकवाना यांच्यात मुलावरुन वाद झाला. त्यातुनच रागाच्या भरात मकवानाने सोनाली आणि कुणालला हातोडीने मारहाण केली. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने चाकूने वार करून दोघांना गंभीर जखमी केलं. सोनाली आणि कुणालला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आरोपी किरणकुमार मकवानने स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2015 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close