S M L

शाहरुख खानला 'ईडी'ने पुन्हा बजावला समन्स

Sachin Salve | Updated On: Oct 27, 2015 12:41 PM IST

शाहरुख खानला 'ईडी'ने पुन्हा बजावला समन्स

27 ऑक्टोबर : बॉलिवूडचा अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानला ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयाने नव्यानं समन्स बजावलंय. नाईट रायडर्स स्पोर्ट्समधल्या शेअर्सच्या विक्रीप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलंय.

रेड चिली इंटरटेनमेंट या शाहरूखच्या कंपनीनं नाईट रायडर्स स्पोर्ट्सची फ्रँचाईजी घेतलीय. 2008 मधलं हे प्रकरण आहे. जय मेहतांना

शेअर्स देण्यात आलेले शेअर्सचं मूल्य कमी ठेवण्यात आल्याचा शाहरुखवर आरोप आहे. शाहरूखला कालच ईडीच्या समोर हजर राहणं गरजेचं होतं. पण, त्यानं हजर राहण्यासाठी दुसरी तारीख मागून घेतली. शाहरुखला ईडीनं तिसर्‍यांदा समन्स बजावलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2015 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close