S M L

इस्थर अनुह्या हत्येप्रकरणी आरोपी चंद्रभान सानप दोषी

Samruddha Bhambure | Updated On: Oct 27, 2015 03:59 PM IST

इस्थर अनुह्या हत्येप्रकरणी आरोपी चंद्रभान सानप दोषी

27 ऑक्टोबर : इस्थर अनुह्या बलात्कार आणि हत्ये केल्याप्रकरणी आरोपी चंद्रभान सानप याला मुंबईच्या सेशन्स कोर्टाने दोषी ठरवलंय. सानपच्या शिक्षेसदंर्भात उद्या (बुधवारी) सुनावणी होणार आहे.

5 जानेवारी 2014 च्या पहाटे ती हैदराबादहून ट्रेनने कुर्ला टर्मिनसला आली. पण कुर्ला टर्मिनसवर उतरल्यापासून तिचा काहीच पत्ता लागला नव्हता. 10 दिवसांनी तिचा मृतदेह कांजुरमार्ग ते भांडुप दरम्यान इस्टर्न एक्स्प्रेस वे लगतच्या झुडपामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. यानंतर सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चंद्रभान सानप याला अटक करण्यात आली होती. चंद्रभान सानप हा भांडुपचा रहिवासी आहे. आणि त्याच्यावर रेल्वेमध्ये चोर्‍या करणे, दरोडे घालण्याचे खटले दाखल आहेत. अखेर आज सेशन्स कोर्टाने सानपला दोषी ठरवलं आहे.

असा लागला प्रकरणाचा छडा

या प्रकरणी पोलिसांनी 36 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचं फूटेज तपासलं आणि त्याआधारेच खुनाचा छडा लावला. ही घटना घडली त्यादिवशीचं कुर्ला स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी सानपचा छडा लावला होता. त्यात इस्थर अनुह्यासोबत कुर्ला टर्मिनसवर एक अनोळखी व्यक्ती दिसत होती. इस्थर 5 जानेवारी रोजी लोकमान्य टिळक कुर्ला टर्मिनसवर पहाटे पाच वाजता उतरली होती. त्यादिवशीच्या स्टेशनवरच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फूटेजमध्ये इस्थर सोबत एक 35 ते 40 वयातील एक व्यक्ती दिसली होती. या व्यक्तीने इस्थरच्या सामानाची ट्रॉली हातात घेतली होती. हा व्यक्ती आरोपी चंद्रभान सानप होता. खुनाच्या रात्री इस्थर कुर्ला स्टेशनवर उतरल्यावर सानपनं इस्थरला 300 रुपयांत घरी सोडेन असं सांगितलं. मात्र सानपकडे टॅक्सी नसून मोटारसायकल असल्याचं लक्षात आल्यावर इस्थरनं नकार दिला. त्यावर आपला मोबाईल नंबरही घेऊन ठेवा, असं म्हणत इस्थरला सानपनं राजी केलं. त्यानंतर तिला एका अज्ञात जागी नेऊन तिच्यावर बलात्कार करून, तिची गळा दाबून हत्या केली. सुरुवातीला आपला उद्देश केवळ चोरीचा होता. मात्र नंतर आपलं मन बदललं, अशी कबुली सानपनं दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2015 03:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close