S M L

फ्लिपकार्टवर लवकरच ऑफलाईन खरेदीही करता येणार !

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2015 12:15 PM IST

फ्लिपकार्टवर लवकरच ऑफलाईन खरेदीही करता येणार !

28 ऑक्टोबर : ऑनलाईन खरेदीमध्ये आघाडीची फ्लिपकार्ट आता लवकरला ऑफलाईनही उपलब्ध होणार आहे. ज्या ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करता येत नाही किंवा त्याबाबत साशंकता असते, अशांसाठी फ्लिपकार्ट ऑफलाईन व्यवसायही सुरू करणार आहे.

सुरुवातीला फक्त मोबाईल फोन फ्लिपकार्टवर ऑफलाईन खरेदी करता येतील. यासाठी फ्लिपकार्टने काही दुकानांशी करार केलाय. या दुकानांमध्ये तुम्ही तुम्हाला हवा असलेला मोबाईल बघू शकता आणि जो आवडेल त्याची ऑर्डर तो दुकानदार फ्लिपकार्टच्या ऍपवरून

देईल. मग मोबाईलची डिलिवरी त्या दुकानात किंवा तुमच्या घरीसुद्धा मिळू शकेल. अशापद्धतीने पूर्ण समाधान झाल्यावर ग्राहक आपोआपच ऑनलाईन खरेदीकडे वळेल, असा विश्वास फ्लिपकार्टच्या अधिकार्‍यांना वाटतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2015 12:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close