S M L

'स्पेशल 26' स्टाईल भोवली, 2 भामटे जेरबंद

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2015 01:44 PM IST

'स्पेशल 26' स्टाईल भोवली, 2 भामटे जेरबंद

28 ऑक्टोबर : अहमदनगर शहर पोलिसांनी दोन तोतया सीबीआय अधिकार्‍यांना जेरबंद केलंय. आदित्य गुजर आणि सागर जाधव अशी या भामट्यांची नावं आहेत. हे दोन्ही तोतयांकडून पोलिसांनी सीबीआईचे बनावट ओळखपत्र, एक एअर पिस्टलही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोलमोहर रोड परिसरात हे दोन्ही चोर व्यापार्‍यांना 'स्पेशल 26' या फिल्मी स्टाईलने लुटण्याच्या बेतात होते. पण पोलिसांना याचा सुुगावा लागताच त्यांनी सापळा रचून त्यांना जेरबंद केलं. या दोन्ही तोतयांना तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2015 01:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close