S M L

प्रॉपर्टीसाठी औरंगाबादमध्ये सख्ख्या भावाला तब्बल 20 वर्षे खोलीत डांबलं

Samruddha Bhambure | Updated On: Oct 28, 2015 06:10 PM IST

प्रॉपर्टीसाठी औरंगाबादमध्ये सख्ख्या भावाला तब्बल 20 वर्षे खोलीत डांबलं

28 ऑक्टोबर : पैशाच्या हव्यासापोटी माणुस अमानुषपणाच्या कुठल्या थराला जाऊ शकतो याचा प्रत्यय औरंगाबादमध्ये आला आहे. प्रॉपर्टीसाठी भावाने सख्या भावाला एक - दोन दिवस नव्हे तर तब्बल 20 वर्षांपासून एका खोलीत डांबून ठेवल्याची धक्कादायक घटन समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या देऊळगाव बाजार या गावामध्ये हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे.

अर्जुन इंगळे व्यक्तीला त्याचा सख्खा भाऊ राजेंद्रनं डांबून ठेवलं. राजेंद्र इंगळे हा गावचा पोलीस पाटील आहे. गेल्या 20 वर्षांपासून अख्ख्या गावाला याची माहिती असली तरी कुणी बाहेर सांगण्याचे धाडस केलं नाही. मात्र राजेंद्रचा व्हिडीओ व्हॉट्सअपवर फिरू लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

प्रॉपर्टीच्या वादातून भावानं डांबून ठेवल्याचं गावकर्‍यांच म्हणणं आहे. तर अर्जुन हा मानसिक रुग्ण असून, त्याचा गावाला त्रास होऊ नये, म्हणून डांबूल ठेवल्याचा अजब दावा, राजेंद्र इंगळेने केला आहे.

दरम्यान हा प्रकार उघड झाल्यानंतर डांबून ठेवलेल्या अर्जुन इंगळेची सुटका केली गेलीय. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सू मोटो दाखल करुन घेतली असून अर्जुनवर उपचार करण्याचे आदेशही औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2015 06:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close