S M L

राजनचा भारतात परतण्याचा मार्ग खडतर ?

Sachin Salve | Updated On: Oct 29, 2015 08:29 AM IST

Rajan arrest banner29 ऑक्टोबर : कुख्यात गँगस्टर छोटा राजन ऊर्फ राजन निकाळजेला इंडोनेशियात अटक झाली असली तरी त्याला भारतात आणणं इतकं सोपं नाही अशी माहिती उच्चपदस्थ सरकारी सूत्रांनी आयबीएन-नेटवर्कला दिलीय.

राजनला भारतात सोपवायला इंडोनेशियन कोर्ट कदाचित परवानगी देणार नसल्याचं समजतंय. भारताकडे दोन पर्याय आहेत. एकतर राजनला भारतात आणणं आणि ते शक्य नसेल तर त्याच्यावर तिथंच खटला चालवणं. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआयची टीम या आठवड्यात बालीला जाणार आहे.

त्यासाठीची कागदपत्रं सीबीआयनं जमवली आहेत. दरम्यान, बालीमध्ये राजनला ज्या जेलमध्ये ठेवण्यात आलंय तिथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2015 08:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close