S M L

भले शाब्बास !, मराठवाड्याच्या कन्येनं मिस डिव्हा युनिव्हर्स स्पर्धेवर उमटवला ठसा

Sachin Salve | Updated On: Oct 30, 2015 08:36 AM IST

भले शाब्बास !, मराठवाड्याच्या कन्येनं मिस डिव्हा युनिव्हर्स स्पर्धेवर उमटवला ठसा

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

29 ऑक्टोबर : मराठवाड्याच्या कन्येनं मिस डिव्हा युनिव्हर्स स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावलाय. तिच्या या यशामुळे दुष्काळात होरपळत असलेल्या औरंगाबादकरांना आनंद साजरा करण्यास एक कारण मिळालंय.

औरंगाबाद विमानतळावर नवेली देशमुख उतरली ती मूळी मिस डिव्हा युनिव्हर्स स्पर्धेत पटकावलेला रत्नजडित मुकुट धारण करूनच..औरंगाबादकर तिच्या स्वागताला ढोल-ताशे घेउन सज्ज होतेचं..नवेलीसोबत सेल्फी काढण्याचा मोह महिला पोलिसांनाही आवरला नाही.

नवेलीच्या या यशामुळे देशपातळीवर औरंगाबादचं नाव पुन्हा एकदा झळकलंय. तब्बल 16 सौंदर्यवतीशी स्पर्धा करुन नवेलीने हे यश संपादन केलंय. नवेली आता जागतिक मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

नवेली भरतनाट्यममध्ये पारंगत असून राष्ट्रीय स्तरावर बास्केटबॉल खेळली आहे. सौंदर्य, रॅम्पवॉक, उंची,बुद्धिमत्ता आणि हजरजबाबीपणा मराठवाड्याच्या या कन्येनं यश मिळवलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2015 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close