S M L

साद देती हिमशिखरे...

3 फेब्रुवारीहाडं गोठवणारी थंडी...बर्फाच्या टोप्या घालून बसलेली सुरूची झाडं, हिमशिखरं..आणि निळ्या आभाळाला भिडेलेले एव्हरेस्ट! एकदा तरी एव्हरेस्ट सर करायचंच अशी प्रत्येक गिर्यारोहकाची इच्छा असते. तर हा नितांतसुंदर हिमालय पाहावा, अनुभवावा असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाला हे शक्य होत नाही. पण हिमालय आणि एव्हरेस्टचं हे विलोभनीय रुप सध्या पाहायला मिळतंय नेहरु सेंटरमध्ये. इथं सध्या एव्हरेस्ट नावाची ही एक तासांची डॉक्युमेंट्री दररोज दाखवली जातेय. गिर्यारोहक कृष्णा पाटीलनं नुकतीच ही डॉक्युमेंट्री रिलीज केली. 29 हजार फूट उंचीच्या माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहक कशी चढाई करतात त्याचं थरारक चित्रण या डॉक्युमेंट्रीत केलं गेलंय. एव्हरेस्ट यशस्वीपणे सर करणा-या कृष्णा पाटीलने यानिमित्ताने आपले अनुभव सांगितले. भारतात काहीसा दुर्लक्षित असलेला गिर्यारोहण हा क्रिडा प्रकार या डॉक्युमेंट्रीमुळे रुजायला निश्चितच मदत होईल, असंही ती यावेळी म्हणाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2010 04:46 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2010 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close