S M L

500 दिवसांनंतरही 'अच्छे दिन'चा पत्ता नाही -राज ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Oct 29, 2015 10:41 PM IST

500 दिवसांनंतरही 'अच्छे दिन'चा पत्ता नाही -राज ठाकरे

29 ऑक्टोबर : 100 दिवसांत 'अच्छे दिन' येणार होते, 500 दिवसंानंतरही 'अच्छे दिन'चा पत्ता नाही, असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा डोंबिवलीतील आपल्या भाषणात नाशिकच्या कामाचा लेखाजोखा मांडला. मात्र याचवेळी राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही काल प्रेझेंटेशन दाखविल्यानंतर आज सेनाही प्रेझेंटेशन दाखवत आहे. नेहमी काय आमच्या मागे-मागे येतात, असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परराष्ट्र दौर्‍यावरही राज ठाकरेंनी टीका केली. जेव्हा पाहावं तेव्हा आपले पंतप्रधान परदेशी असतात. त्यांच्यापाठोपाठ आमचे मुख्यमंत्रीही जातात. तसंच देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील कारभारही काँग्रेसप्रमाणे दिल्लीला विचारूनच केला जातो, राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

दरम्यान कल्याण-डोंबिवलीत गेल्या 20 वर्षांपासून सत्ता असताना सावरकर, टिळक आठवले नाहीत आणि आता त्यांच्या नावांनी मतं मागितली जात आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.

भाषणातील ठळक मुद्दे :

  • देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील कारभारही काँग्रेसप्रमाणे दिल्लीला विचारूनच केला जातो
  • कल्याण-डोंबिवलीत 20 वर्षांपासून सत्ता असताना सावरकर, टिळक आठवले नाहीत
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र दौर्‍यावर राज ठाकरे यांची टीका
  • 100 दिवसांत अच्छे दिन येणार होते, 500 दिवसांनंतर सुद्धा 'अच्छे दिन'चा पत्ता नाही
  • आधी मनसेने प्रेझेंटेशन केले तेच पाहून शिवसेनाही प्रेझेंटेशन आता करीत आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2015 10:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close