S M L

तुमची पॉवर सत्तेतली, माझी पॉवर रस्त्यावरची -राज ठाकरे

Sachin Salve | Updated On: Oct 30, 2015 10:18 PM IST

ibnlokmat_agenda_maharashtra_2015_event (37)30 ऑक्टोबर :  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजेंडा महाराष्ट्र कार्यक्रमाचं दुसर सत्र आपल्या रोखठोक स्टाईलने गाजवलं. परप्रांतीय, राष्ट्रवादी, नरेंद्र मोदी यांच्यावर राज ठाकरेंनी सडकून टीका केली. निवडणुकीच्या पूर्वी शरद पवारांना हद्दपार करणार, राष्ट्रवादी भ्रष्टवादी पार्टी आहे अशी टीका करणारे पंतप्रधान मोदी बारामतीत जाऊन त्यांचे सल्ले घेतात. जेटली तर देशात 100 बारामती उभाराव्यात अशी स्तुतीसुमनं उधाळली. याला नेमकं काय म्हणायचं ?, निवडणुकीआधी टीका आणि निवडणुकीनंतर मांडीला मांडी लावून बसायचं हा सगळा धोतांडपणा आहे अशी टीका राज यांनी भाजपवर केली.

राज यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांवर आसूड ओढला. परप्रांतीयांमुळे महाराष्ट्र बकाळ झालाय. ज्यावेळी लातूरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा कुणी मदत केली होती ?, मदतीला ही लोकं धावून आली नाही. पण, जेव्हा गुजरातमध्ये भूकंप झाला तेव्हा मुंबईतील गुजरात्यांनी भरभरून पैसा पाठवला मग लातूर का मदत केली नाही ?, इथं राहायचं, मोठं व्हायचं पण मदतीसाठी माघार घ्यायची हे नियमात बसणारं नाही. दुष्काळपरिस्थिती निर्माण झाली तरीही कुणी पुढाकार घेतला नाही. जर महाराष्ट्रात राहायचं असेल पुढाकार घेतलाच पाहिजे असं परखड मत राज यांनी व्यक्त केलं.

तसंच शहरं स्वच्छ ठेवणं गरजेचं, पण असं आज होत नाही. बाहेरून आलेले लोंढे शहरांची पुरती वाट लावून ठेवलीये. बाहेरुन आलेली माणसं जेव्हा मतदारसंघ निर्माण करता तेव्हा भीती निर्माण होते.अबू आझमी सारखा माणूस दोन दोन मतदारसंघातून निवडून येतो हे त्यांचं उदाहरण असून भविष्यात ही धोक्याची घंटा आहे. आज बाहेरून आलेले लोंढे आपल्या नोकर्‍या हिसकावून घेत आहे. पण मुळात आपलं कुंपनच शेत खातं हा मोठा प्रश्न आहे. रेल्वेभरतीच्या वेळी बाहेरून आलेले लोंढे जागा मिळवता. आम्ही जेव्हा याची माहिती मराठी मुलांना पोहचवली तेव्हा 5 लाख मुलांची रेल्वेभरतीचा अर्ज भरले. पण, ही माहिती त्यांच्याजवळ पोहचत नसले तर मराठी मुलांना नोकर्‍या कशा मिळणार ? असा परखड सवाल राज यांनी उपस्थित केला.

टोलचा पोलखोल करणारच - राज ठाकरे

टोलचा मुद्या जर आम्ही मांडला नसता महाराष्ट्राच्या पटलावर आला नसता असं स्पष्ट करत आमच्या टोल आंदोलनामुळे राज्य सरकारला टोल बंद करावे लागले. टोल आंदोलन सुरू होतं तेव्हा इतर पक्ष रस्त्यावर उतरले नाही. जर टोलचा विषय काढला नसता तर कुणालाच हा विषय कळालाही नसता. टोलविरोधात आंदोलन सुरूच राहिल आणि आणखी टोलची पोलखोल करणार असं राज यांनी यावेळी जाहीर केलं.

..मी रस्त्यावरच्या पॉवरमध्ये आहे -राज ठाकरे

स्वच्छ आणि चांगला महाराष्ट्राचं स्वप्न पाहणार मी माणूस आहे. जे शक्य होणार नाही ती स्वप्न मी कधीच दाखवणार नाही.

मी राज्याच्या सत्तेत पॉवरमध्ये नाही पण रस्त्यावरच्या पॉवरमध्ये आहे असं राज ठणकावून सांगितलं. इथल्या माणसाला मान सन्मान मिळाला पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. पण आम्ही एका बाजूला काम करतोय आणि दुसरे सुपार्‍या घेऊन काम करत आहे अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली.

पाकनेही नीट वागावं - राज ठाकरे

माझा पाकिस्तानी कलाकारांना विरोध नाही. मुळात हा विषय कलाकारांचा नाही तर देशात्या वृत्तीचा आहे. कलाकारांना बंदी घालण्यापेक्षा वृत्तीत बदल केला पाहिजे. जर देवाणघेवाण करायचीच असेल तर पाकनेही तसंच वागलं पाहिजे असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

फेसबुकपेक्षा फेसव्हॅल्यू जपली पाहिजे -राज ठाकरे

आपण ट्विटरवर कधी येणार ?, असा सवाल विचारला असता राज यांनी आपल्या स्टाईलने हा प्रश्न टोलावून लावला. रोज कोण-कोण ट्विट करत बसणार आहे. आपलं बरं आहे एकदाच बोलायचं. त्यामुळे ट्विटवर वगैरे काही जमणार नाही. खरंतरं फेसबुकपेक्षा फेसव्हॅल्यू जपली गेली पाहिजे असा खुमासदार टोला लगावत राज यांनी ट्विटर फेसबुक नको रे बाबा असा पवित्रा घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2015 10:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close