S M L

मुंबईची वाढ होण्याला आता मर्यादा -गडकरी

Sachin Salve | Updated On: Oct 30, 2015 10:23 PM IST

ibnlokmat_agenda_maharashtra_2015_event (5)

30 ऑक्टोबर : अजेंडा महाराष्ट्र परिषदेची सांगता झाली ती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या चर्चा सत्राने. नितीन गडकरींनी राज्याच्या पायाभूत सुविधांवर प्रकाशझोत टाकला. येणार्‍या काळात काय-काय करता येईल याचा लेखाजोखा गडकरींनी मांडला. महाराष्ट्र आणि मुंबई माझं घरं, केंद्रात फक्त मी राज्याचा दूत आहे असं सांगत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. याअगोदरही मी मंत्री असतांना कामाचा धडाका तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल. आताही त्याच उमेद्दीने काम करतोय. मुंबई ते गोवा सिमेंट क्रॉक्रिटकरण करून चार पदरी रोडचं काम सुरू आहे. महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी 4 एक्स्प्रेस वे चं काम सुरू आहे अशी माहिती यावेळी गडकरींनी दिली. एवढंच नाहीतर ज्या मार्गाने वारी प्रस्थान होत असते त्या मार्गांमध्ये वारकर्‍यांना विश्राम करता यावा यासाठी विश्रांतीगृह उभारणाराचा प्रयत्न सुरू आहे असंही गडकरींनी सांगितलं.

यावेळी गडकरींनी मुंबईबद्दल स्पष्ट आणि परखड मत मांडलं. मुंबई माझं घरं आहे. पण आता या घराला मर्यादा आली आहे. बाहेरून आलेल्या लोंढ्यांमुळे मुंबईत आता जागाच उरली नाही. त्यामुळे इथं नवे कारखाने काढण्यात अर्थ नाही असं स्पष्ट मत गडकरींनी व्यक्त केलं. पण, मुंबईसाठी खूप काही करायचंय. मुंबईला लाभलेला अथांग समुद्राचं पाणी स्वच्छ करायचं. परदेशातील समुद्रात आपला चेहराही दिसतो. तसाच अरबी समुद्रात आपला चेहरा दिसेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे अशी माहितीही गडकरींनी दिली.

तसंच दुबईतील बूर्ज खलीफा सारखी भव्य अशी उंच वास्तू आहे. तशीच वास्तू राजा छत्रपती टॉवर नावाने महाराष्ट्रात उभारायची आहे. या इमारतीत 100हून जास्त मजले असतील. सर्वात वरच्या मजल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रांची गॅलरी असेल असं स्वप्नंही गडकरींनी बोलून दाखवलं. टोलचा झोल मीच सुरू केला बंदही मीच करणारा या आपल्या वादग्रस्त विधानाचं स्पष्टीकरणही गडकरींनी दिलं. हे विधान फक्त राजकीय स्टंट होतं. मी स्वत: 67 टोल बंद केले आणि लवकरच आणखी 17 टोल बंद करणार अशी घोषणाही गडकरींनी केली.

साहित्यिकांनी मोदी सरकारला टार्गेट करू नये- गडकरी

साहित्यिकांनी पुरस्कार परत करतायत त्यांची मानसिकता आमच्या लक्षात आलीये. मुळात डॉ. कलबुर्गी आणि दादरी प्रकरणाचा केंद्राशी संबंध नाही. हा राज्य सरकारच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यांना पुरस्कार परत करायचे असेल तर राज्य सरकारकडे जाऊन करावे. पण, जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट झाले, खैरलांजी प्रकरण घडलं, दाभोलकर, पानसरेंची हत्या झाली तेव्हा साहित्यिकांनी पुरस्कार का परत केले नाही असा सवाल उपस्थित करत साहित्यिकांनी मोदींना जबाबदार धरू नये असं ठणकावून सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2015 10:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close