S M L

घाटकोपरमध्ये टेक्सटाईल कंपनीला लागलेली आग आटोक्यात

Sachin Salve | Updated On: Oct 31, 2015 12:16 PM IST

घाटकोपरमध्ये टेक्सटाईल कंपनीला लागलेली आग आटोक्यात

31 ऑक्टोबर : मुंबईतील घाटकोपर युनिव्हर्सल टेक्सटाईल या कंपनीला सकाळी सहा वाजेच्या सुमारास आग लागली. गोदामातील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली आहे.

या आगीत अग्निशमन दलाचे कर्मचारी भागवत निकम किरकोळ जखमी झालाय. या गोदामात मोठ्या प्रमाणात कपडे असल्याने आग आटोक्यात आणायला उशीर लागला. अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांनी आग आटोक्यात आण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही आग कशी लागली हे मात्र अजून स्पष्ट होऊ शकले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2015 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close